Khabardar News आवाज जनतेचा

Publisher ID: pub-3431642135444895

ब्रेकिंग न्यूज

वाटंबरे केंद्र शाळेमध्ये शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी.

 वाटंबरे केंद्र शाळेमध्ये शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी.


सांगोला तालुका वाटंबरे येथील जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळेमध्ये शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी केली गेली.

या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आटपाडी एज्युकेशन सोसायटीचे सचिव हनमंत पवार सर यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले.


 प्रमुख पाहुण्यांनी आपल्या मनोगतात छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास सांगताना त्यांचे बालपण स्वराज्यासाठी त्यांनी केलेल्या लढाई , राज्याभिषेक या सर्व गोष्टीचा इतिहास त्यांनी विद्यार्थ्यांना यावेळी सोप्या भाषेत समजावून सांगितला तसेच यावेळी त्यांनी पुस्तके ज्ञानाबरोबर सामाजिक आणि आर्थिक ज्ञान असणे गरजेचे आहे असे सांगितले तसेच जीवनामध्ये यशस्वी बनायचं असल्यास तडजोडी करायला शिकले पाहिजे असे सांगितले तसेच यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना जीवनात यशस्वी होण्याचा कानमंत्र दिला .

यावेळी माजी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष दत्तात्रय पवार यांनी आपले मनोगत व्यक्त करताना म्हटले आपण या जन्मात छत्रपती शिवाजी महाराज होऊ शकणार नाही पण कमीत कमी त्यांचे विचार घेऊन मावळे होण्याचा प्रयत्न करूया असे विद्यार्थ्यांना म्हटले यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांनीही आपले मनोगते व्यक्त केले.

ज्या विद्यार्थ्यांनी वक्तृत्व, धावणे ,सांस्कृतिक निबंध स्पर्धेमध्ये नंबर पटकाविले अशा विद्यार्थ्यांना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते पारितोषिक व शालेय साहित्य देऊन सत्कार करण्यात आला.

या कार्यक्रमाला शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष भाग्यवान पवार, उपाध्यक्ष दिगंबर साळुंखे प्रज्ञा चंदनशिवे ,उथळे यावेळी उपस्थित होते.


छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीचे औचित्य साधत माजी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष दत्तात्रय पवार यांनी आपल्या मुलाच्या वाढदिवसानिमित्त शाळेला शिवाजी महाराजांची मूर्ती भेट म्हणून दिली .

यावेळी शाळेच्या वतीने त्यांचा व मुलांचा शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष भाग्यवान पवार व सर्व मान्यवरांच्या हस्ते गुलाब पुष्प देत सत्कार करण्यात आला.

या कार्यक्रमाची प्रास्ताविक कोकरे सर यांनी केले सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन मासाळ गुरुजी यांनी केले.

हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी शाळेच्या मुख्याध्यापिका मनीषा मिसाळ व तेली मॅडम यांनी विशेष असे परिश्रम घेतले


.

No comments