Khabardar News आवाज जनतेचा

Publisher ID: pub-3431642135444895

ब्रेकिंग न्यूज

कात्रज प्रशासनाला जाग केव्हा येणार? नागरिकांतून संतप्त सवाल.

कात्रज प्रशासनाला जाग केव्हा येणार? नागरिकांतून संतप्त सवाल.
पुणे प्रतिनिधी :कांताभाऊ राठोड 

10/05/2025 रोजी कात्रज येथे सायंकाळी साडेसहाला दुगड बिल्डिंग शेजारील ओढ्यात 5 वर्षाचा मुलगा पाण्यातुन वहात गेला ...अमोलदादा चव्हाण यांच्या मालती - माधव बिल्डिंग पर्यंत वाहुन गेला होता ... स्थानिक नागरिकांनी शोध घेऊन त्याला बाहेर येण्यास मदत केली आणि ओढ्याला कमी पाणी असल्यामुळे आणि केवळ दैव बलवत्तर म्हणुन आज तो मुलगा वाचला आणि चालत मागे येऊ शकला.फक्त काही वाईट घटना घडल्यावरच उपाययोजना करायच्या का? अर्ध्या पेक्षा जास्ती ओढ्यावर स्लॅब टाकण्यात आला आहे ... आमची कैक वर्षांपासून पुणे महानगरपालिका कडे मागणी आहे सदर ओढ्यावर स्लॅब टाकण्याची ... कृपया लवकरात लवकर संबंधित अधिकाऱ्यांनी सदर घटनेची नोंद घेऊन त्वरित निर्णय घ्यावा ही नम्र विनंती. अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा सत्या फाउंडेशनच्या अध्यक्षा गीतांजली गोरखनाथ जाधव आणि स्थानिक नागरिकांनी यांनी दिला आहे.

No comments