Khabardar News आवाज जनतेचा

Publisher ID: pub-3431642135444895

ब्रेकिंग न्यूज

खिलारवाडीचे सुपुत्र डॉ. दत्तात्रय काळेल यांना जीवन गौरव पुरस्कार.

खिलारवाडीचे सुपुत्र डॉ. दत्तात्रय काळेल यांना जीवन गौरव पुरस्कार.
                                 
 खिलारवाडी ता. सांगोला येथील सुपुत्र प्रा.डॉ. दत्तात्रय मारुती काळेल यांना नुकताच श्री स्वामी समर्थ जीवन गौरव राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त झाला आहे. राज्यातून अनेक प्रस्ताव प्राप्त झाले होते त्यामधून समितीने 22 जणांची जीवनगौरव पुरस्कारासाठी शिफारस केली होती. त्यामध्ये डॉ. काळेल यांचे सामाजिक व शैक्षणिक कार्य पाहता व त्यांना या अगोदरही अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहेत. त्याबद्दल त्यांना सांगोला तालुक्याचे आमदार मा. शहाजी बापू पाटील, दामाजी कारखान्याचे चेअरमन मा. शिवानंद पाटील, सोलापूर जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ. जयमालाताई गायकवाड व पंढरपूरचे युवा नेते प्रणव परिचारक यांच्या शुभहस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. 

यावेळी सोलापूर जिल्हा परिषदेचे माजी शिक्षणाधिकारी मा. जितेंद्र खंडागळे साहेब, प्रा. नाथाजी चौगुले, नगरसेवक गुरुदास अभ्यंकर तसेच स्वामी समर्थ शिक्षण प्रसारक मंडळाच्या अध्यक्षा सुवर्णाताई खंडागळे, सचिव मा. संकेत खंडागळे इत्यादी उपस्थित होते. हा पुरस्कार मिळाल्यामुळे डॉ. काळेल यांचे सर्व स्तरांमधून अभिनंदन होत आहे. डॉ. काळेल हे सध्या के.बी.पी. महाविद्यालय पंढरपूर येथे राज्यशास्त्र विभागाचे सहयोगी प्राध्यापक म्हणून कार्यरत आहे.

No comments