श्री छत्रपती शिवाजी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज प्रशालेची यशराज गांडूळ खत प्रकल्पाला भेट.
श्री छत्रपती शिवाजी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज प्रशालेची यशराज गांडूळ खत प्रकल्पाला भेट.
[विद्यार्थ्यांना व शिक्षकांना गांडूळ खता बद्दल माहिती देत असताना सुरेश पवार.]
श्री छत्रपती शिवाजी हायस्कूल ज्युनियर कॉलेज वाटंबरे प्रशालेने प्रशालेतील माजी विद्यार्थी सुरेश पवार यांच्या अल्पावधीत शेतकऱ्यांच्या पसंतीस उतरलेल्या यशराज गांडूळ खत प्रकल्पाला भेट दिली. यावेळी सुरेश पवार यांनी आलेल्या विद्यार्थ्यांना गांडूळ खता विषयी मार्गदर्शन करताना गांडूळ खत तयार करण्यापासून त्यांचा वापर, उत्पादन, बेड लावणे, वर्मी वॉश तयार करणे तसेच शेतीसाठी सेंद्रिय खताचा उपयोग याविषयी विद्यार्थ्यांना माहिती दिली .
यावेळी प्रशालेतील शिक्षक तानाजी खंडागळे, टी एम कांबळे व ज्युनिअर कॉलेजचे विद्यार्थी मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते.
चौकट:
ज्या प्रशालेमध्ये मी शिक्षण घेतलं त्या प्रशालेतील विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी आज माझ्या गांडूळखत प्रकल्पास भेट दिली त्यामुळे मी खूप आनंदित आहे यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना उद्योग व्यवसायामध्ये जिद्द चिकाटी मेहनत करण्याची तयारी ठेवावी लागते असे सांगितले.

No comments