Khabardar News आवाज जनतेचा

Publisher ID: pub-3431642135444895

ब्रेकिंग न्यूज

श्री छत्रपती शिवाजी हायस्कूल ज्युनियर कॉलेज वाटंबरे येथे माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा संपन्न.

 श्री छत्रपती शिवाजी हायस्कूल ज्युनियर कॉलेज वाटंबरे येथे माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा संपन्न. 


वाटंबरे /प्रतिनिधी:श्री छत्रपती शिवाजी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज वाटंबरे या प्रशालेत सन१९९०-९१ या एसएससी बॅचचा स्नेह मेळावा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. याप्रसंगी सन १९९०-९१ बॅचमधील माजी विद्यार्थी, सेवानिवृत्त शिक्षक, शिक्षकवृंद शिक्षकेत्तर कर्मचारी वर्ग यावेळी उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रशालेच्या प्राचार्या नीता पवार होत्या.
कार्यक्रमाची सुरुवात परिपाठाने करण्यात आली प्रशालेचे माजी विद्यार्थी  सुभाष भंडगे गुरुजी यांनी प्रार्थना घेतली त्यानंतर प्रशालेतील दिवंगत शिक्षक व बॅचमधील विद्यार्थी यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. या वेळी उपस्थित गुरुवर्य शिक्षकांचा सत्कार माजी विद्यार्थ्यांच्या वतीने करून त्यांना गुरुवंदना देण्यात आली.
सर्व माजी विद्यार्थ्यांनी आपला अल्प परिचय देताना प्रशालेतील अनेक आठवणींना यावेळी उजाळा दिला या प्रशालेतुन शिक्षण, ज्ञान व संस्काराची शिदोरी घेऊन गेलेले विद्यार्थी वेगवेगळ्या क्षेत्रात आपला ठसा उमटवत  आहेत तसेच यातील काही विद्यार्थी प्राध्यापक, प्राथमिक शिक्षक ,माध्यमिक , उच्चमाध्यमिक शिक्षक ,व्यापारी, प्रगतशील बागायतदार तसेच अनेक क्षेत्रात कार्यरत आहेत.
सर्वांनी आपल्या मनोगतात शाळेबद्दल कृतज्ञता व्यक्त करत असताना आपल्या जडणघडणीत प्रशालेचा वाटा किती महत्वाचा आहे या प्रशालेतून मिळालेले शिक्षण व गुरुजींना कडून मिळालेले संस्काराची शिदोरी आम्ही आजही ३२ वर्षापर्यंत सुद्धा विसरलो नाही म्हणून तर आम्ही निर्व्यसणी व कर्तबगार घडलो अशा आठवणी त्यांनी यावेळी जागवल्या.
याप्रसंगी उपस्थित सेवानिवृत्ती शिक्षक कोळवले सर ,विभुते सर, बिनवडे सर, बनसोडे मॅडम, बीएच पवार सर ,पिंटू पवार सर, संस्था अध्यक्ष मोहन पवार यांनी आपल्या मनोगतात जुन्या आठवणींना उजाळा दिला. तसेच ही संस्काराची शिदोरी आपण पुढच्या पिढीला देऊन सर्वांना ज्ञानसंपन्न व संस्कारक्षम बनवावे असे विचार व्यक्त करून माजी विद्यार्थ्यांचे पुढील आयुष्य आनंददायक तसेच निरोगी आरोग्य संपन्न जावो अशा  शुभेच्छा त्यांनी आपल्या मनोगतात दिल्या.
अध्यक्षीय भाषणात प्रशालेच्या प्राचार्या निता पवार  यांनी अशा प्रकारचे स्नेह मिळावे दरवर्षी आयोजित करून एकमेकांच्या सुखदुःखात सहभागी व्हावे मेळाव्याच्या माध्यमातून विचारांची देवाण-घेवाण होईल तसेच प्रत्येकाला जीवनामध्ये एक नवीन ऊर्जा निर्माण होईल असे विचार व्यक्त केले तसेच प्रशालेच्या माजी विद्यार्थ्यांनी वरचेवर प्रशाला भेट देऊन ऊर्जा देण्याचे काम करावे असे त्यांनी अध्यक्षीय भाषणात त्या म्हणाल्या.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नवनाथ तळे गुरुजी यांनी केले व प्रशालेच्या वतीने पिंटू पवार यांनी सर्वांचे आभार मानले.

No comments