मराठा आरक्षणासाठी वाटंबरे येथील मराठा समाज आक्रमक.
मराठा आरक्षणासाठी वाटंबरे येथील मराठा समाज आक्रमक.
{शाळेत विद्यार्थी न पाठवण्याचा मराठा समाजाचा निर्णय}
सांगोला तालुका वाटंबरे गावात मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी व मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाच्या समर्थनार्थ सकल मराठा समाजाने आक्रमक भुमिका स्वीकारली.सोमवार ३० ऑक्टोंबर रोजी सकल मराठा समाजाची श्री छत्रपती शिवाजी चौकात बैठक पार पडली या बैठकीत मराठा आरक्षणासाठी या ठिकाणच्या मराठा समाजाने मोठ्या प्रमाणात आक्रमक भूमिका स्वीकारली. बुधवार १ सप्टेंबर रोजी रास्ता रोको आंदोलनासाठी या ठिकाणच्या सकल मराठा समाजाने सांगोला तहसील कार्यालय व सांगोला पोलीस स्टेशन येथे निवेदन दिले. मंगळवार 31 ऑक्टोबर रोजी वाटंबरे गाव बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला, यावेळी गावातील सर्व शाळेचा बंद मध्ये सहभागी होण्याचे या वेळी मराठा समाजाच्या वतीने आव्हान करण्यात आले त्या आव्हानाला सर्व शाळेनी शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला, जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण भेटत नाही तोपर्यंत गावातील प्रशासकीय कारभार बंद ठेवण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला , मराठा समाजातील सर्व पालकांनी जोपर्यंत आरक्षण भेटत नाही तोपर्यंत आपल्या मुलांना शाळेत न घालवण्याचा निर्णय घेतला व भव्य मशाल मोर्चाचे आयोजन केले .
सकल मराठा समाजाने पुकारलेल्या गावबंद निर्णयाला वाटंबरेकरानी उस्फुर्त असा प्रतिसाद देत पूर्णपणे कडकडीत असे गाव बंद ठेवले सायंकाळी सात वाजता मशाल मोर्चा काढण्यात आला या मशाल मोर्चासाठी गावातून मोठ्या प्रमाणावर मराठा समाज या वेळी उपस्थित होता या मशाल मोर्चामध्ये महिलांनी मोठ्या प्रमाणात आपला सहभाग नोंदविला .
मशाल मोर्चाची सुरवात श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास महीलांच्या हस्ते पुष्पहारअर्पण करून सुरुवात करण्यात आली .या वेळी पूर्ण गावांमध्ये पदयात्रा काढत मशाल मोर्चाची फेरी मारली या वेळी या मशाल मोर्चाला जमलेल्या मराठा समाजातील युवकांनी अभी नहीं तो कभी नहीं,एक मराठा लाख मराठा, आरक्षण आमच्या हक्काचे नाही कोणाच्या बापाचे, मनोज जरांगे पाटील तुम आगे बढो हम तुम्हारे साथ हैं आशा घोषणा दिल्या.आणि मोर्चाचा शेवट श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर करण्यात आला. या वेळी गावातील इतर समाजाने मराठा आरक्षणाला आपला पाठिंबा जाहीर केला
.हे आंदोलन आरक्षण मिळेपर्यंत चालू ठेवण्याचा निर्धार या वेळी येथील मराठा तरूणांनी घेतला .




No comments