येळकोट येळकोट जय मल्हारच्या गजरात मंगळवारी रंगणार वाटंबरे येथील यात्रा महोत्सवाचा सोहळा.
येळकोट येळकोट जय मल्हारच्या गजरात मंगळवारी रंगणार वाटंबरे येथील यात्रा महोत्सवाचा सोहळा.
वाटंबरे /प्रतिनिधी: महाराष्ट्र , कर्नाटकात प्रसिद्ध असणारे सांगोला तालुका वाटंबरे येथील जागृत देवस्थान खंडोबा यात्रा महोत्सवाला चैत्र शुद्ध सप्तमी शुक्रवार दि. ४ एप्रिल घटस्थापना होऊन सुरुवात झाली,
चैत्र शुद्ध चतुर्दशी शुक्रवार दि. १९ हनुमान जयंती उपवास पालखी नगर प्रदक्षिणा,
चैत्र शुद्ध पौर्णिमा शनिवार दि. १२ हनुमान जयंती व घट उत्थपन झाले आहे यात्रेच्या आदल्या दिवशी सोमवार दि. १४ रोजी रात्री खंडोबा देवाचा सल्ला (छबिना) व श्रीची पालखी व आरती ,
चैत्र वद्य द्वितीया मंगळवार दि. १५ रोजी यात्रेचा मुख्य दिवस या दिवशी दुपारी दोन वाजता लंगर ( साखळी ) तोडणे व श्रीचा रथोत्सव व सायंकाळी वाघ्या मुरळी कार्यक्रम होणार आहे व मनोरंजनाचा कार्यक्रम आयोजित केला गेला आहे तरी या यात्रेचा सर्व भाविक भक्तांनी लाभ घेण्याचे आव्हान वाटंबरे खंडोबा देवस्थान च्या वतीने करण्यात आले आहे.
चौकट:
खंडोबा देवस्थानच्या चैत्र यात्रा महोत्सवाला चैत्र शुद्ध सप्तमी शुक्रवार दिनांक 4 रोजी घटस्थापनेने सुरुवात झालेली असून सोमवार दि. १४ रोजी खंडोबा देवस्थान समोर पारंपारिक सल्ला खेळला जातो यात गावातील सर्व नागरिक यावेळी सहभागी होत असतात तसेच मंगळवार दिनांक १५ एप्रिल रोजी खंडोबा देवस्थान चा यात्रेचा मुख्य दिवस असतो यावेळी खंडोबा देवाच्या पालखीची नगरप्रदक्षिणा होते यावेळी या पालखीवर आलेले भाविक भक्त खोबरे आणि भंडाऱ्याची उधळण करतात व येळकोट येळकोट जय मल्हार चा नारा देतात शेवटी लंगर तोडण्याचा (साखळी) विधी होताच किती कड्यावर साखळी तुटली जाते हे ऐकताच यात्रेची सांगता होते व रात्री वाघ्या मुरळीचा खंडोबा देवस्थान मध्ये कार्यक्रम आयोजित केले गेलेले असतात तरी या यात्रेचा सर्व भाविक भक्तांनी लाभ घ्यावा.
देवस्थान पुजारी.
दिलीप निकम.
मंगळवार रात्री नऊ वाजता श्री छत्रपती शिवाजी हायस्कूल पटांगणावर ऑर्केस्ट्रा धमाल.



No comments