Khabardar News आवाज जनतेचा

Publisher ID: pub-3431642135444895

ब्रेकिंग न्यूज

रत्नागिरी नागपूर राष्ट्रीय महामार्गावर पाचेगाव खुर्द येथे मराठा समाजाचे रास्ता रोको आंदोलन.

 रत्नागिरी नागपूर राष्ट्रीय महामार्गावर  पाचेगाव खुर्द येथे मराठा समाजाचे  रास्ता रोको आंदोलन.



वाटंबरे /प्रतिनिधी : सगेसोयरे कायद्याची अंमलबजावणी करून त्याचे कायद्यात रूपांतर करावे या मागणीसाठी  मनोज जरांगे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली  महाराष्ट्रात मराठा समाजाच्या वतीने गावोगावी रास्ता रोको आंदोलन केले जात आहे या पार्श्वभूमीवर सांगोला तालुका पाचेगांव खुर्द येथे  शनिवारी दि. २४ फेब्रुवारी रोजी रत्नागिरी नागपूर राष्ट्रीय महामार्गावर रस्ता रोको आंदोलन करण्यात आले.

यावेळी दोन्ही बाजूला वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. मराठा आंदोलकांकडून थांबलेल्या प्रवाशांना थंड पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात आली होती त्यामुळे प्रवाशांनी मराठा समाजाच्या या उपक्रमाची स्तुती केली. यावेळी उपस्थित मराठा बांधवांनी उपस्थित समाजाला मनोज जरांगे यांच्या आंदोलनाविषयी सविस्तर माहिती सांगितली.

मराठा समाजाकडून शांततेत पार पडलेल्या आंदोलनावेळी सांगोला पोलीस स्टेशनच्या वतीने चोख बंदोबस्त ठेवण्यात आलेला होता  प्रशासनाने केलेल्या सहकार्याबद्दल मराठा समाजाने पोलिसांचे यावेळी आभार मानले गेले. तसेच शासनाचे प्रतिनिधी म्हणून मंडलाधिकारी वर्षा बरबडे यांनी निवेदन स्वीकारले.



  • चौकट:
  • अंतरावली सराटी येथील विश्वंभर भांदरगे पाटील हे कोल्हापूरहुन  आंतरवलीकडे जात असताना ते यावेळी रास्ता रोको मध्ये सहभागी झाले यावेळी त्यांनी मनोज जरांगे पाटील त्यांच्यासोबतच्या अनुभव उपस्थिताना सांगितले.



  1. चौकट: मराठा समाजाच्या वतीने  महाराष्ट्र मध्ये मोठमोठे आंदोलने शांततेने पार पडत आहेत या आंदोलनाचा सर्वसामान्य नागरिकांना कोणत्याही प्रकारचा त्रास सहन होत नाही त्याची प्रचिती या आंदोलनामध्ये दिसून आली  रत्नागिरी नागपूर राष्ट्रीय महामार्ग रोखून धरल्यामुळे रस्त्याच्या दुतर्फा वाहनांची मोठ्या प्रमाणात रांगा लागलेल्या दिसून येत होत्या यावेळी उपस्थित मराठा आंदोलकाच्या वतीने सर्वांना थंड पाण्याच्या पिण्याचे सोय केली गेली होती. प्रवाशामधून या उपक्रमाबद्दल समाधान व्यक्त केले जात होते.

No comments