Khabardar News आवाज जनतेचा

Publisher ID: pub-3431642135444895

ब्रेकिंग न्यूज

दसरा व दिवाळी सणानिमित मागेल त्याला पाच किलो हरभरा दाळ - चेतनसिंह केदार सावंत

दसरा व दिवाळी सणानिमित मागेल त्याला ५ किलो हरभरा दाळ - चेतनसिंह केदार सावंत 
सांगोला (तालुका प्रतिनिधी): लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार व खासदार रणजितसिंह निंबाळकर यांच्या माध्यमातून दसरा व दिवाळी सणानिमित्त मागेल त्याला दाळ योजनेतंर्गत राज्यातील प्रत्येक व्यक्तीला ६० रुपये प्रति किलो दराने प्रत्येकी पाच किलो हरभरा दाळ देण्यात येणार आहे. आहे. २४ ऑक्टोंबर रोजी दसरा सणापासून आधारकार्डवर मागेल त्याला दाळ योजनेचा शुभारंभ करण्यात येणार असून जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन भाजपचे जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत यांनी केले आहे.
        याबाबत बोलताना भाजपचे जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत म्हणाले की, देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार व खासदार रणजितसिंह निंबाळकर यांच्या माध्यमातून दसरा व दिवाळीनिमित्त मागेल त्याला दाळ योजनेतंर्गत राज्यातील प्रत्येक व्यक्तीला ६० रुपये प्रति किलो दराने प्रत्येकी पाच किलो हरभरा दाळ मिळणार आहे. सर्वसामान्यांना ही दाळ स्वस्त दरात मिळावी म्हणून नाफेडच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील प्रत्येक नागरिकाला आधार कार्डच्या ओळखपत्रावर प्रति व्यक्ती ५ किलो दाळ उपलब्ध करून दिली जाणार आहे.
        सांगोला शहरातील वाढेगांव नाका येथील भाजपचे जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत यांचे संपर्क कार्यालय , कोळा , नाझरे व घेरडी या गावात हरभरा दाळ विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे. दाळ खरेदीसाठी आधार कार्ड सक्तीचे असून एका कुटुंबात पाच सदस्य असतील तर प्रति व्यक्ती ५ किलो दाळ खरेदी करता येणार आहे. सांगोला तालुक्यात भाजपच्या वतीने मागेल तेथे दाळ विक्रीकेंद्र दसऱ्यापासून सुरू करण्यात येणार आहे. नागरिकांना भाजप जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत यांच्या पक्ष कार्यालयात संपर्क करावा असे आवाहन करण्यात आले आहे.

No comments